.
सरडा
.
एकदा एक सरडा गवताच्या रंगात बदलत असताना त्याला तलावाच्या नितळ पाण्यात स्वत:चं प्रतिबिम्ब दिसलं.पुढे कधी ताम्बड्या मातीतून, कधी पिवळ्या पाचोळ्यातून सरपटताना स्वत:मधला बदल निरखायची सवय लागून गेली त्याला. एक दिवस त्याचाच त्याला प्रश्न पडला, "माझा खरा रंग आहे तरी कुठला ?" तो विचार करू लागला ----
.
"तो मी नव्हेच" म्हणताना ह्यातला "तो" कोण ? असा प्रश्न पडण्याइतकी रूपं बदलणं खरंच श्रेयस्कर आहे ?
.
त्याला उत्तर मिळालं की नाही, कुणास ठाऊक. मला मात्र वाटतं, सरडा निदान स्वसंरक्षणासाठी निसर्गत: रंग बदलतो. गम्मत म्हणून रूपं बदलणार्या मानवी सरड्यांना हा प्रश्न कधीच पडत नसेल ??????
.
प्रभा.
.
No comments:
Post a Comment